प्राध्यापक वसंतराव पुरके सरांचा संपर्क दौरा, राळेगाव शहरातील मतदारांच्या घेतल्या भेटी



विधानसभा निवडणुका दिवसेंदिवस जोर धरू लागल्या असतांनाच महाविकास आघाडीचे उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांनी दिनांक 24/10/2024 रोज गुरूवारपासून मतदारांच्या भेटी घेऊन हितगुज करण्यासाठी निघाले असून सुरवात राळेगाव शहरापासून केली असून सर्वप्रथम प्रभाग क्रमांक तेरामध्ये सकाळी 9.00 वाजता अशोकराव भागवत यांच्या निवासस्थानी, प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सकाळी ठीक 10 वाजता प्रदीप डाखोरे यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ठीक 11 वाजता भुपेंद्र चांदेकर यांचे घरी प्रभाग क्रमांक सोळामध्ये ठीक 12वाजता महादेव मंदिराजवळ प्रभाग क्रमांक सतरामध्ये ठीक 1 वाजता अनिल डंभारे यांचे निवासस्थानी प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये दुपारी 3 वाजता प्रतिक बोबडे यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक नवमध्ये दुपारी 4 वाजता राममंदिर येथे प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा सायंकाळी 5 वाजता नरेंद्र जयसिंगकार यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक सहा सात आठ सायंकाळी ग्रामीण विकास प्रकल्प येथे प्रभाग क्रमांक एक दोन तीनमध्ये सायंकाळी 6 वाजता प्रभाग क्रमांक एक दोन तीनमध्ये सायंकाळी 7 वाजता विठ्ठल मंदिरात चर्चा करण्यात आली.त्यावेळी प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांनी सर्व मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि सत्ता बदल का आवश्यक आहे याचे महत्त्व समजावून सांगितले त्यावेळी सत्तेवर रोष व्यक्त केला सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांनी ही निवडणूक शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, शेतमजूरांना खूप महत्त्वाची असून महाविकास आघाडीच्या भूमिका स्पष्ट केल्या त्याच प्रमाणे कांग्रेस पक्षाचे ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनीअर अरविंदभाऊ वाढोणकर यांनी सुद्धा महागाई आणि शेतकऱ्यांच्या मालाला न परवडणारा भाव याबद्दल सत्ताधाऱ्यांवर टीका करून आपण निवडणूक का लढायची आणि कुणासाठी लढायची याचे महत्त्व समजावून सांगितले.त्यावेळी त्यांच्या सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपकभाऊ देशमुख, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंदभाऊ इंगोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे,नगराध्यक्ष रविंद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धवल घुंगरूड, शिवसेना शहरप्रमुख इम्रान खान पठाण , मधूकर राजूरकर, सुनील भामकर अफसर अली,तसेच वेगवेगळ्या संस्थेचे कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आजच्या शुभ दिनी मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच विजयाचे संकेत देणारा असून राळेगाव शहरात लोकसभेपेक्षा दुप्पट लीड मिळवून देण्याचे कार्यकर्ते आणि मतदारांनी आणि महिला भगिनी यांनी ठरवले असल्याचे राळेगाव शहरातील विविध प्रभागातील लोकांनी प्राध्यापक वसंतराव पुरके सरांना सांगितले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.