
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील सेंट्रल बँक वाढोणा बाजार येथील महिला कर्मचारी या़ंचा मनमानी कारभार
नागरिकांना मिळते असंभ्य वागणूक सविस्तर वृत्त असे
राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथे सेन्ट्रल बँक ची शाखा आहे या शाखेला पंधरा ते वीस गावे जोडली आहे दररोज या शाखेत खाते धारकांची गर्दी असते निराधार, दैनंदिन व्यवहार , शेतकरी, शेतमजूर या शाखेत येत असतात आज रोजी सोमवार ला या शाखेत आलेले बॅक खातेदारांना महिला बॅक कॅशीयरने तसेच बसून ठेवले असता मागून आलेल्या धनदंडक्यांचे व्यवहार अगोदर सुरू केले व निराधार उचलण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना तसेच ताटकळत बसवून ठेवले विशेष म्हणजे या शाखेत वयोवृद्ध महिला किंवा पुरुष यांना त्यांचे नाव घेऊन बोलावले जात आहे.या कारणावरून दररोज या शाखेत महिला बॅक कॅशीयर सोबत बाचाबाची होतांना दिसत आहे.वरिष्ठांनी या बाबतीत दखल घेऊन संबंधित महिला बॅक कॅशीयरला समज न दिल्यास या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट या बॅकेतुन आपले खाते बंद करून दुसऱ्या बॅंकेत खाते उघडणार असल्याचे सांगितले जात आहे
