जगदीश ढुमने पाच हजारासाठी अडकले राळेगांव तालुक्यात भ्रष्टचाराची कीड; महिन्याची सुरवात अन शेवटीही ट्रॅप

सहसंपादक: रामभाऊ भोयर

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी भ्रष्टाचाराने बरबटले आहे. ही किड मुळतः नष्ट होणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. एकाच महिन्यात सुरुवातीला अन् शेवटीही एसीबीच्या झालेल्या कारवाईवरुन सिध्द होते. मिटर बसविण्याकरीता शासकीय शुल्का व्यतिरिक्त अतिरिक्त पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करणा-या लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (ता.३०) राळेगाव येथील महावितरण कार्यालयात यवतमाळ लाच लुचपत विभागाने केली. यावेळी एकच खळबळ उडाली आहे.
राळेगाव येथील वीज वितरण कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंता म्हणून जगदीश श्रीराम ढुमणे हे कार्यरत आहे वर्ग दोन अधिकारी म्हणून ते या ठिकाणी कार्यरत आहे तक्रारदार यांनी त्यांच्या घरी नव्याने मोटर
लावण्यासाठी संपूर्ण कागपत्राची पूर्तता करून ते केस पेपर वीज वितरण कार्यालयाच्या संबंधित अधिकान्याला दिले अनेक दिवस पर्यंत त्या कागदावर पूर्तता करण्यात आली नाही शेवटी तक्रारदाराने काय अडचण आहे अशी विचारणा केली असता अभियंता दूमणे यांनी पाच हजार स्पये लाच मागितली होती तक्रारदार यांनी या संदर्भात त्यांना होकार दिला आणि ३० जानेवारीला तुम्हाला पाच हजार रुपये आणून देतो असे सांगितले
होते याच कालावधीत तक्रारदार यांनी लाच लुचपत तक्रार नोंदविली प्रतिबंध खाते यवतमाळ कार्यालयाने या ठिकाणी सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना
वर्षाच्या सुरुवातीला भूमापकही जाळ्यात
रंगेहात पकडले. सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती, सचीद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नानवाडे, अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, अब्दुल वसीम, पोना सचीन
भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ज्पुरी, यवतमाळ यांनी केली असून
राळेगांव शहरातील ही लाच लुचपत विभागाची एकाच महिन्यात ही दुसरी कारवाई असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महावितरण चे अभियंता यांच्यावर लाच लुचपत विभागाची कारवाई
राळेगाव शहरातील ही महिनाभरात लाच लुचपत विभागाची दुसरी कारवाई याच महिन्यात राळेगाव शहरात भूमी अभिलेख येथील भूमापक याच्यावर सहा आनेवारी रोजी लाच लुचपत विभागाने कारवाई केली होती