
ल
ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे दिनांक 4 मार्च रोजी श्री. गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून श्री. गजानन महाराज सेवा समिती, ग्रामीण रुग्णालय, राळेगाव कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून रक्तदान करून आपली सेवा दिली. श्री. अमोल खेकारे व अड वैभव पंडित यांच्या रक्तदानाने शिबिर प्रारंभ करण्यात आले. डॉ. रमा बाजोरिया निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. वंदना महाजन वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, राळेगाव यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर घेण्यात आले होते. त्यामध्ये . बाळूभाऊ धुमाळ रुग्नसेवक,समाजसेवक, तथा डॉ. भीमराव कोकरे, सामाजिक कार्यकर्ता भूषण उंडे यांचे विशेष सहकार्य या रक्तदान कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता राळेगाव शहरातील शैक्षणिक संस्था व सर्व बँकाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या रक्तदान शिबीरास वसंतराव नाईक, शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीतील डॉ. किरण भारती रक्तपेढी प्रमुख, श्री. आशिष खडसे वैद्यकीय सामाजिक अधीक्षक, . पंकज खंडारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, . शुभम पारधी अधिपरिचारिका या चमूनी रक्तसंकलन करून सहकार्य केले.
सदर कार्यक्रमामध्ये श्रीमती यंगड यांनी रक्तदानाचे महत्व उपस्थितांना विशद केले. कार्यक्रमाकरिता ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथील अधिकारी/ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले….
