

सहसंपादक : रामभाऊ भोयर
रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकने एसटी महामंडळाच्या वाहक प्रशिक्षण वाहनाला मागील बाजूस धडक दिल्याने एसटी बसचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले तर चार प्रशिक्षणार्थी वाहक जखमी झाले.
प्रशिक्षण वाहनात वाहकासह अंदाजे १५ शिकाऊ वाहक होते. परंतु या अपघातात सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही. ही घटना मध्यरात्री १२.३० च्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील सोनुर्ली फाट्याजवळ घडली.
पांढरकवडा डेपोचे वाहक प्रशिक्षण वाहन क्रमांक एमएच ४० व्हाय ५७२३ हे नागपूर पांढरकवडा या मार्गावर नवीन शिकाऊ वाहकांना प्रशिक्षण देण्यासाठी गेले होते.रात्री परतीच्या प्रवासादरम्यान प्रशिक्षण वाहन पांढरकवडाकडे जात होते दरम्यान सोनूर्ली फाट्याजवळ टी एन २९ सी टी १२७२ या क्रमांकाच्या ट्रकने प्रशिक्षण वाहनाला मागाहून जोराची धडक दिली. यात प्रशिक्षण वाहनाचा मागील भाग क्षतिग्रस्त होऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले तर चार प्रशिक्षणार्थी वाहक जखमी झाले. याची तक्रार प्रशिक्षण वाहनाचे चालक दयाराम बापूराव आत्राम वय ४९ वर्ष रा.पिंपरी रोड पांढरकवडा यांनी वडकी पोलीस स्टेशनला केली. तक्रारीवरुन वडकी पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांचे मार्गदर्शनात बीट जमादार रमेश आत्राम आकाश कुदुशे हे करीत आहे.
