आमडी येथे वन्य प्राण्यां मुळे शेतकऱ्यांच्या शेतमाला चें नुकसान भरपाई देण्याची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

घाटंजी तालुक्यातील आमडी येथील शेतकरी अरविंद ठाकरे यांच्या शेतातील ऊभ्या कापूस व तूर या पिकांचे अतोनात नुकसान वन्यप्राण्यानी केल्याची तक्रार वनरिक्षेत्र अधिकारी, तालूका कृषी अधिकारी, व तहसीलदार यांचेकडे केली आहे
सदर शेतक-याचे म्हणने नुसार त्यांनी कसेबसे कर्ज काढून आपल्या शेतमालाची पेरणी केली आहे तसेच खते व औषधे फवारून शेतमालाचे संगोपन केले आहे व शेतमालाची परस्थीती चांगली असताना , यावर्षी पिक चांगले होईल या आशेवर असताना रोही, रानडूक्कर या वन्यप्राण्यांनी शेतमालाचे अतोनात नुकसान केल्यामुळे तसेच सर्व कूटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबुन असून मूलांच्या शिक्षणाचा खर्चही त्यातूंच करावा लागत असल्याने आता त्यांच्या समोर कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न ऊभा झाला आहे तेव्हा त्यांनी आपल्या शेतातील नुकसानीची मोका पाहणी करून नुकसान भरपाई वनविभाग व शासनाकडून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.