
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी विनोद धामंदे यांच्या घरी दुर्मिळ जातीचा साप निघाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या घरी विटा च्या खाली साप आहे असे त्यांना कळले असता त्यांनी त्या सापाविषयी एम एच 29 हेल्पिंग हँड चे सदस्य अभिजीत ससनकर यांना फोन करून कळविले त्यांनी वेळ वाया न जाता शिवाजीनगर येथील सर्पमित्र आदेश आडे ला त्या ठिकाणी पाठवले सर्प मित्रांनी त्या सापाला इजा न होता पकडले व डबा बंद केले व परिसरातील लोकांना सापाविषयी माहिती दिली व भयमुक्त केले.
एम एच 29 हेल्पिंग हॅन्ड ही संस्था वन्यजीव यांना वाचवायला नेहमी कार्यरत असते मागील सात आठ वर्षापासून ही संस्था राळेगाव तालुक्यामध्ये काम करीत आहे. त्या पकडलेल्या सापाची माहिती संस्थेचे तालुकाध्यक्ष संदीप लोहकरे यांना देण्यात आली.
सापा विषयी अधिक माहिती घेतली असता प्राणी मित्र, सर्पमित्र संदीप लोहकरे सांगतात की हा साप White Banded Wolf Snake (कवड्या) प्रजातीचा दुर्मिळ साप आहे राळेगाव तालुक्यामध्ये या सापाची ही दुसरी नोंद आहे या आधी हा साप 2020 मध्ये बरडगाव या गावात आढळला होता या सापाची ही राळेगाव तालुक्यात दुसरी आणि राळेगाव शहरात पहिलीच नोंद आहे. हा साप बिनविषारी आणि निशाचर आहे रात्रीला हा साप जास्त सक्रिय असतो कलर काळा पांढरे पट्टे आणि छोटे डोके अधिक तर लांबी या सापाची 90 सेंटीमीटर एवढी असते दिसायला हा साप विषारी मन्यार सारखा दिसतो हा साप नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये जास्त आढळला जातो जसे दार्जिलिंग, आसाम, आणि हिमालय आता हा साप आपल्याही परिसरामध्ये मिळाल्याने सर्पमित्रांमध्ये ही आनंदाची बातमी आहे. आजवर या संस्थेच्या सदस्यांनी अनेक सापांना दुर्मिळ सापांना व वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.
राळेगाव आणि तालुक्यामध्ये एम एच 29 हेल्पिंग हँड्स चे तीसहून अधिक सदस्य आहे त्यात अभिजीत ससनकर, आदेश आडे, सिद्धांत थुल, तेजस्विनी मेश्राम, मोहन देवकर, युवराज देवकर, दयानंद आडे, करण नेहारे, विक्रम एडसकर, गौरव खामकर, गणेश राखुंडे हे नेहमी आपल्या सेवेत हजर आहे.
साप अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे त्यांना जीवनदान देणे हे आपले काम आहे लोकांनी सापाला न मारता स्वतःचा आणि सापाचा जीव धोक्यात घालू नये कुठलाही वन्यजीव धोक्यात किंवा आपल्या परिसरात आढळून आल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 ला किंवा एम एच 29 च्या राळेगाव तालुक्यासाठी 9561905143 या क्रमांकाला संपर्क करणे असे आव्हान प्राणिमित्र सर्पमित्र संदीप लोहकरे यांनी दिले आहे.
