
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
गॅप इंक अर्थ सहाय्य केअर इंडियाद्वारे वूमन + वाटर या प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण विकास प्रकल्प, राळेगाव मध्ये इंटरफेस मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते.
गॅप इंक अर्थसंचालित केअर इंडिया च्या वूमन+वाटर् या प्रोजेक्ट अंतर्गत राळेगाव तालुक्यामधील सर्व गावांमध्ये महिला व पुरुषांना ट्रेनिंग देऊन त्यामध्ये महिलांना सक्षम करणे तसेच स्वच्छता व त्याचे महत्व, कुटुंबातील संवाद, ताणतणाव, समस्याचे निराकरण, आर्थिक स्त्री पुरुष समानता अश्या विविध प्रकारची माहिती ९० मिनिटाच्या सेशन घेऊन त्यांना ६ महिने प्रशिक्षण दिले जाते. या ट्रेनिंगचा उद्देश असा आहे कि स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा विकास कसा करता येईल हा आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता आणि शौचालय व त्यांचे फायदे या बद्दलची मोहीम सुरु आहे.
त्याचे फायदे काय आहे असे विविध प्रकारची माहिती महिलांना ट्रेनिंगद्वारे देण्यात येत आहे. या संपूर्ण ट्रेनिंगचा आढावा, महिलांना प्रमाणपत्र वाटप, महिलांचे मनोगत, विविध क्षेत्रातील पाहुण्याच्या मनोगतातून, विविध महिलांच्या प्रश्न उत्तरे यासाठी इंटरफेस मीटिंग चे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून विनयभाऊ मूनोद ( मेडिकल असोशियन तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ) यांनी महिलांबद्दल व चालू असलेल्या रूढी परंपरा बद्दल आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे सुरेश आगलावे ( शेतकरी नेते) यांनी पर्यावर आणि शेती किती महत्वाची आहे या बद्दल मार्गदर्शन केले . चैतन्य संस्थेच्या सरलाताई वावघणे यांनी महिलांना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन केले. रुपेश रेंगे ग्रामगिताचार्य यांनी महीलांचे ग्रामीण जिवन व सक्षमीकरण यावर चर्चा तसेच केअर इंडियाचे प्रास्ताविक बाळू शिंदे ( केअर तालुका इंडिया समन्वयक) यांनी केले तसेच केअर इंडियाचे सुनील मानकर (मॉनिटरिंग इव्याईलेशन) यांनी केअर इंडिया संस्थे बद्दल सविस्तर माहिती दिली. हा सर्व कार्यक्रम महाराष्ट्राचे केअर इंडियाचे प्रमुख रविकांत घाटोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केअर इंडिया चे ट्रेनर दुर्गेश गुरणुले यांनी केले.तर आभार प्रदर्शन निखिल इंगोले यांनी केले. त्याचप्रमाणे केअर इंडियाची ट्रेनर अंकुश चामलाटे , स्वप्निल वटाणे, मंगेश पूडके, जय निवल, संगीता ठमके, सुवर्णा कोंडस्कर, लता झोटिंग, वंदना शेंडे, प्रगती कावळे, शितल नरडवार तसेच केअर इंडियाचे सर्व पेस, मेल मेल चाम्पिअन व मोबिलायझर आणि सर्व केअर इंडियाच्या संपूर्ण महिला यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
