
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सन 2024 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागतांना आम्ही सत्तेत आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, असे जाहीर आश्वासन जाहीरनाम्याद्वारे दिले होते तसेच वेगवेगळ्या जाहीर सभांमधूनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केले होते. परंतु दिनांक १० मार्च २०२५ ला २०२५-२६ चा अर्थसंकल्प मांडताना माननिय नामदार अजितदादा पवार, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी जाहीरपणे वक्तव्य केले की, आजच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कर्जमाफी देणे शक्य नाही व बँकांना आदेश दिले की, तात्काळ कर्जाची वसुली करावी तसेच शेतकऱ्यांना सांगितले की, दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत कर्जाच्या रक्कमेची परतफेड करावी. यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय अर्थमंत्र्यांचे विधान हीच सरकारची भूमिका आहे, हे मान्य केले. राज्याचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की, कर्जमुक्तीचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात दिले गेले होते. अशा त-हेने राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
आज राज्यात कापूस, सोयाबीन, तूर व चना यांचे भाव आधारभूत किमतीच्या (एमएसपी) च्या खाली आले आहेत. सध्याच्या केंद्र व राज्याच्या धोरणाप्रमाणे आधारभूत किमतीच्या खाली शेतमालाचे भाव आल्यानंतर ढवळाढवळीच्या योजनेखाली नाफेड, सीसीआय वा पणन महासंघ यांचे मार्फतीने खरेदी करणे धोरणात्मक दृष्ट्या बंधनकारक आहे. परंतु आज सीसीआय किंवा नाफेड कडे संपूर्ण शेतमाल खरेदी करण्याची पूर्णता यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत बाजारात शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागत आहे. आधीच शेतकऱ्यांना खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळत नाही. तसेच विदर्भात सिंचनाच्या अपुऱ्या सोयी आहेत. त्यामुळे पूर्व उत्तरा नक्षत्राचा पाऊस पडला नाही, दुष्काळ झाला, पिके करपली व सक्तीच्या जप्तीच्या वसुलीचे बँकेचे नोटीस आले की शेतकरी जगलाजेस्तव समाजात, सोयरेधाय-यात लाज जाईल, या भीतीपोटी आत्महत्या करून मरत आहेत. वीस वर्षात जवळजवळ ४७ हजार शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्या आहेत आणि आत्महत्यांचे सत्र विदर्भात सातत्याने सुरू आहे. म्हणून सरकारच्या या भूमिकेचा शेतकरी संघटना निषेध करते व राज्य कार्यकारीणीची बैठक घेतल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे.असे शेतकरी सघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य, विजय निवल, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रज्ञाताई बापट, जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, तंत्रज्ञान आघाडी प्रदेशाध्यक्ष मिलिंद दामले, जयंतराव बापट, देवरावजी धांडे स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे,दशरथ पाटील, दिपकअन्ना आनंदवार,देवेंद्र राउत, इंदरचंद बैद,चंद्रशेखर देशमुख, हिम्मतराव देशमुख,भास्कर महाजन, अविनाश पोळकट,बबनराव चौधरी, अक्षय महाजन, विक्रम फटींग,गोपाल भोयर, गिरीश तुरके, बंडुजी येरगुडे गजानन ठाकरे, यांनी पत्रकार द्वारे प्रसिद्ध केले
