शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारपेठेत येत आहे व दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय ठेवीसाठी मल्टीस्टेटच्या चेल्या चपाट्यांनी ठेवीसाठी कसली कंबर पण ढाणकी शहरात मात्र प्रतिसाद शून्य गिरी हूई इज्जतच


प्रतिनिधी::प्रवीण जोशी , ढाणकी


अनेक सहकारी संस्थांनी सर्वसामान्यांच्या रकमेवर आपली स्वप्न पूर्ण केली. पण ज्यांच्या भरोशावर हे गर्भ श्रीमंत झाले अशा सर्वसामान्य प्रामाणिक ग्राहकांची मात्र फसवणूक झाली. वारेमाप कर्ज देताना आपले नातेवाईकांच्या संदर्भातील दया. स्वतःला ज्यावेळेस रक्कम पाहिजे अशा वेळेस नियम डावलून त्यात लवचिकता आणून आपली वेळ साजरी करून घेणे. पण गोरगरीबाने कष्टाने रक्कम कमावलेल्या रकमेच या गद्दार वृत्तीला काही घेणे देणे नसते. विविध कामासाठी ठेवलेल्या रकमा असतील भेटायला तयार नाही. आजार कोणाला शुभ प्रसंगी गुंतवलेल्या रकमेसाठी ग्राहक हैराण आहेत. अधिक व्याज देणाऱ्या “गंगा” “नदीला” अखेर घर घर लागली कोणत्याही क्षणी ते ठिकाण रफू चक्कर होऊ शकते. शहरातील कारभाराचा आर्थिक भार सोसत नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाखेतून सर्व व्यवहार करणार असल्याचे ऐकिवात आहे.त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात रक्कम काढत आहे. व एक आरडी एजेंट पळून जाऊ शकतो ही शक्यता सुद्धा नाकारता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अनेक ठेवीदारांनी आपले खाते बंद करत आहे. दिनदर्शिकेवर जाहिरात मिळवण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे चालू आहे पण अशा फालमफोक यंत्रणेला कोणीच जाहिरात दयायला सुद्धा तयार होईना.ही बोलघेवडी यंत्रणा रक्कम घेऊन पळून गेले तर आपली गोची होईल असे ग्राहकांना वाटते असेल??
ढाणकी शहरात सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसगत झाली असल्याकारणाने आता ग्राहक सतर्क झाला आहे. मल्टीस्टेटवाल्यांचे चेले चपाटे शहरात आपल्या मालकांनी सांगितलेल्या कर्तव्याचे चोखपणे काम करत आहेत. पण ग्राहकांनी मात्र अगदी समसूचकता व सावधानता बाळगलेली असून एक रुपयाची सुद्धा “भिक’ मल्टीस्टेट वाल्यांच्या दळभद्री यंत्रेला आतापर्यंत दिली नाही हे विशेष. केवळ गाठी भेटी घेतल्यानंतर आलेले चेले चपाटे फोटोसेशन करून आपली कातडी वाचावी म्हणून तो फोटो ग्रुप वर टाकल्या व भेटी दिल्या असे दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कमिशन वाले त्यांचे दलाल व नोकरदार हैराण असताना त्या अवसान गळालेल्याना स्फूर्ती येण्यासाठी जगाड्या पोटाड्या चेल्या चपाट्याना दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात बोनस देऊन त्यांच्यात जीव फुंकण्याचे काम करून अधिकाधिक ठेव जमवण्याची आम्हीष दाखवत आहेत. चेले चपाटे सुद्धा कधीही न बोलणाऱ्या व्यक्तीला व आपले जुने नातेसंबंधाची आठवण करून काही तरी ठेव मिळेल ही अशा बाळगून आहेत. पण ही बांडगुळी यंत्रणा अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे आमच्या पाठीमागे खूप मोठा वलय आहे शाखा आहे पण या सगळ्या थापा असू शकतात दिवाळी सण काही दिवसावर येऊन ठेपलाय विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या आप्तेष्टांना विविध ग्रुप वर कमिशन वाले व्याजदराचे फलक पाठवत आहे. स्टेटस ठेवून प्रचार करत आहेत पण त्यांना मात्र ढाणकी शहरात शून्य टक्के प्रतिसाद आहे तेव्हा या गद्दार मल्टीस्टेट वाल्या ंच्या टोळी पासून सर्वसामान्यांनी सतर्क राहायला हवे.