माजी विद्यार्थ्याची सावंगी शाळेला भेट

सहसंपादक : रामभाऊ भोयर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथे शाळेचा माजी विद्यार्थी रचित संदीप सुरपाम हा सन –2019-20 ला शिकत होता. अतिशय अभ्यासू व शाळेच्या प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेत स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारा रचित संदीप सुरपाम याने सन 2019-20 मध्ये नवोदयची परीक्षा उत्तीर्ण करीत शाळेच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला. उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत नवोदय विद्यालय घाटंजी येथे प्रवेश घेतला.तिथही हॉकी या खेळात राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य प्राप्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे यांनी रचितला सतत प्रोत्साहित केले.आजही तो नित्यनेमाने त्यांना घरी भेटायला येत असतो.
शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुस्तक, पेन व सन्मान चिन्ह देऊन रचितला गौरविण्यात आले. याप्रसंगी त्याने आपण शिक्षकांमुळेच घडलो. अभ्यासात सातत्य ठेवले व यश मिळवले असे सांगितले.शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
शाळेतील सर्व शिक्षिकांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात व अभिनंदन केले. या कार्यक्रमाला मंगला आगरकर ,रेखा कोवे, अर्चना सुरजुसे व सोनल नासरे यांचे सहकार्य लाभले