
सहसंपादक : रामभाऊ भोयर
केंद्राच्या वतीने शेती पिकांना दिली जाणारी एक रुपयात पीक विमा योजना शासनाने बंद केले असून यंदापासून नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे त्यानुसार खरीप हंगामातील पिक विमा भरण्यासाठी शासनाने सुधारित आदेश जारी केला असून आता शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजून पीक विमा भरावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे मात्र पीक विमा भरण्यासाठी केवळ ९ दिवसच उरले असून सरकारने आता एक रुपयात पिक विमा योजना लागू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे मात्र तालुक्यात बहुतां शेतकऱ्याकडे सिंचनाच्या पुरेशा सोयी सुविधा नसल्याने निसर्गाच्या भरोशावरच शेती करावी लागते अस्मानी सुलतानी संकटाने दरवर्षीच शेतकरी कर्जबाजारी होत आहे अशा काळात एक रुपयातील प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना फलदायी होती परंतु यंदा या योजनेत बदल करण्यात आला आहे खरीप हंगामातील पिकाचा विमा भरताना शेतकरी विषयाची रक्कम भरावी लागणार आहे बदलते हवामान आणि पावसाच्या असंतोलामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढत आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा काढणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांना पिक विमा साठी आपला हिस्सा भरावा लागणार असल्याने खिशावर अधिकचा आर्थिक भार पडणार आहे सोयाबीन कापूस तूर मुंग उडी ज्वारी बाजरी यास इतर पिकांना सुरक्षित करण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत असून केवळ आता दहा दिवस शिल्लक राहिले आहे तरीपण पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षित केला नसून याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे पिक विमा भरल्यास नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते यासाठी शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचा त्यांचा हिस्सा भरावा लागणार आहे
पिकनिहाय शेतकरी विमा हिस्सा रक्कम (प्रतिहेक्टरी)
पिक. हप्ता
ज्वारी ८३
सोयाबीन. ११६०
तूर ४७०
उडीद ६३
मुंग ७०
कापूस ७५०
शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे लागणार
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी)
सातबारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा
यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जेवढे पेरले तेवढीच नोंद पीक विम्याचे अर्जात करावी असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता यंदाचा शासन निर्णयात काय बदल करण्यात आले याची माहिती घेऊनच आजच भरण्याची शेतकऱ्यांना सांगितले जात आहे
बोगस विमा उतरवल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदारांचा आधार क्रमांक पाच वर्षे काळे यादी टाकून त्याला पाच वर्ष कोणत्या शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही असेही २४ जून २०२५ च्या शासन निर्णयात तरतूद आहे
शेतकऱ्यांनी उसनवारी करून केली बियाणे खतांची खरेदी
सध्या शेतकऱ्यांसाठी अडचणीचा काळ असून अनेक जण आर्थिक संकटात सापडले अनेकांनी उसने पैसे घेऊन बी बियाणे आणि खतांची खरेदी केली आता पिक विमा भरण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आणखी एक रुपया पिक विमा योजना सुरू करावी जेणेकरून अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिक विमा भरता येईल
यंदा विविध कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण योजना राबविण्यात येत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ३१ जुलै पर्यंत पिक विमा भरावा पिक विमा भरला तरच आपत्ती काळात पिकाचे नुकसान झाल्यास मदत मिळेल अन्यथा विमान भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
मंडळ कृषी अधिकारी
राजू ताकसांडे राळेगाव
