
प्रतिनिधी
प्रवीण जोशी
ढाणकी
दिनांक१६ ऑगस्ट ते २० पर्यंत संतधार पाऊस होता यामध्ये अनेक काबाडकष्ट करणाऱ्यांचे घर वाहून गेले शेतं खरडून गेली व रोजचे खायला लागणारे अन्नधान्य सुद्धा भिजल्या गेले होते. त्यामुळे अनेकांना रोज जो आहार लागतो तो सुद्धा मिळणे दुर्लभ झाले होते. अनेक जण आले पाहणी केली आणि निघून गेले. पण मदतीचा शब्द जो दिला होता त्यात अनेकांना विसर पडला की काय असे वाटत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ज्या ठिकाणी संकट त्या ठिकाणी संघाचे स्वयंसेवक आले नाही व त्यांनी मदत केली नाही अस शक्यच नाही त्या अनुषंगाने दराटी३८, कोर्टा ४५, चिखली ५७, भवानी १६ घडोळी ५ नारळी ४० या ठिकाणी दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचा संच बाधित असलेल्या गरजवंतांना २२ ऑगस्ट शुक्रवारला पोळा सणाच्या दिवशी ही मदत देऊन एक दिव्य काम केले. गरजूंना मदत करणे हेच संघाचे ध्येयधोरण राहिले आहे. आणि तेच काम आजच्या कृती कर्मा मधून दिसून पडते.. कोणत्याही प्रकारचा मनी स्वार्थ न बाळगता हव्यासाच्या कोसो दूर राहून संघाची ही वाटचाल थक्क करणारी राहिलेली आहे.यात कार्यकर्ता न राहता संघाने एक पायंडा पाडून दिला तो म्हणजे “स्वयंसेवक” म्हणून राहिले पाहिजे. हा कानमंत्र आजही स्वयंसेवक जतन संवर्धन करून कार्य करतात .आजही कार्यकर्ता म्हणून नाही तर एक स्वयंसेवक म्हणून, एखादे काम स्वयंसेवकांनी हाती घेतल्यानंतर ते कधीच अंगुली निर्देश न करता स्वतः हा कोणत्याही प्रकारचा आपल्याला फायदा न बघता केवळ कर्तव्य हेच ध्येय कर्म मानून काम करतात.आणि संघाने जे स्वयंसेवकावर संस्कार केले तो कधी विसरला नाही कितीही प्रसंग कठीण असला तरी तो तडजोड करून संस्काराला छेद न देता अविरतपणे काम करत राहिला हे विशेष. स्वयंसेवकांची सेवा ही वाखण्याजोगी आहे म्हणूनच संघाचे आचार विचार टिकून आहेत. कधी ही स्वयंसेवक हव्यासापोटी लालसेपोटी नको त्या दाराला अथवा ओघात वाहून गेला नाही. स्वतःची आर्थिक वृध्दी व्हावी म्हणून कधीही विचाराचा उपयोग करून लाभ घेतला गेला नाही. हे अनेक दशकापासूनच्या चालत आलेल्या वाटचालीत बघायला मिळाले म्हणूनच हे कार्य अखंडित व अविरत चालू आहे.
