शिक्षण विभाग प. स. कळंब यांच्या विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.
नाट्योत्सव स्पर्धेचे उद्घाटक श् निता गावंडे(उप शिक्षणाधिकारी (प्राथ.) यवतमाळ लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अमोल वरसे ( गटशिक्षणाधिकारी) होते. प्रमुख अतिथी श्रीमती. शिल्पा पोलपल्लीवार व श्री.नारायन हेडाऊ (विस्तार अधिकारी शिक्षण) होते व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते*. नाट्योत्सव स्पर्धेचे सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा सुमधुर गीतांनी झाली. वर्ग ६ ते 10 मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. “मानव कल्याण करीता विज्ञान व तंत्रज्ञान” या आधारावर नाट्य थीम तयार करून तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाले होते.
नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक चिंतामणी हायस्कूल कळंब यांनी प्राप्त केले. तसेच व्दितीय क्रमांक जि. प. बेसिक शाळा कळंब प्राप्त केले व सर्व सहभागी शाळांना प्रोत्साहन सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
*तालुकास्तरीय नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन प्रमुख म्हणून शगुफ्ता खान ( वि. सा. व्य.)यांनी जबाबदारी पार पाडली.सदर स्पर्धेला परीक्षक म्हणून कांचन वानखेडे ( वि. सा. व्य.)लाभले. ( वि. सा. व्य.) तर प्रास्ताविक श्रीमती शितल आरगुलवार ( वि.सा.व्य.)यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन डॉ. वनिता ठाकरे ( वि. सा. व्य.)यांनी केले व श्री. सचिन पोटूरकर ( विषयतज्ञIE)यांनी उपस्थित पाहुण्यांचे व प्राविण्यप्राप्त विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
तालुकास्तरीय नाट्योत्सव स्पर्धेच्या आयोजन करीता सर्व साधन व्यक्ती व सर्व विशेष तज्ञ सर्व विशेष शिक्षक यांनी मोलाचे योगदान दिले