गणरायाच्या मूर्तीवर दगडफेक करणाऱ्या समाज कंटकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी.


दिनांक १७ सप्टेंबरला मंगळवारला अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर प्रथा व परंपरेनुसार ढाणकी शहरात सुद्धा गणरायाचे विसर्जन जल्लोषात व आनंदात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता पार पाडत असताना अंतिम क्षणी गालबोट धब्बा लागून अनुचित प्रकार घडला शहरातील गणेश मंडळे वाद्यरुंद बंद करून विसर्जन स्थळाकडे जात असताना चिमुकल्यांनी स्थापित केलेल्या गणेश मंडळाचे विसर्जन सुरू होते. समाजातील तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींनी दहशत माजून गणरायाच्या मूर्तीचे मोठ्या प्रमाणात विटंबन केले. अशी माहिती काही क्षणात वेगाने शहरात पसरली व मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला जमाव जमला . जमावाला पोलिसांनी वेळीच आवर घातली होणारा अनर्थ रोखल्या गेला.
एकत्रित जमलेल्या संख्येला व चिघळलेल्या परिस्थितीतल्या शमवीण्यासाठी भाजपचे समन्वयक नितीन भुतडा, आ. नामदेव ससाने, रोहित वर्मा, महेश पिंपरवार, संदीप ठाकरे, व बंटी जाधव यांनी परिस्थिती जन्य परिस्थितीचा आढावा घेऊन शांत राहण्याचे आवाहन केले, जे कोणी अशी विदारक परिस्थिती निर्माण करून भीतीदायक वातावरण व दहशत माजवेल अशा जात्यांध शक्तीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

शांतता भंग करून दुफळी निर्माण करणाऱ्यावर योग्य कारवाई होत नाही तो पर्यंत विसर्जन करणार नाही अशी ताठर भूमिका घेतल्यानंतर पोलीस प्रशासन तत्काळ हरकतीत येऊन दोषीवर कडक कारवाई करू व आरोपीला जेर बंद करू अशा प्रकारच अभिप्रेत केल्यानंतर दिनांक १८ बुधवार रोजी गणरायाचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार काही जणांना अटक करून २९२/२०२४ कलम.. बीएनएस २९८,१८९,१८९(२),१८९(९),१९०,१९१(१),१९२(२),१९१(३),१९२,११८(१),३५२,३५१(३) नुसार कारवाई करण्यात आली. सद्यस्थितीत परिस्थिती ही संचारबंदी सारखी आहे. आर्थिक व्यवहाराची ठिकाने सुरळीत चालू असून तणावपूर्ण शांतता आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ होऊ नये यासाठी पियुष जगताप अतिरिक्त पोलीस अधीक्षक यवतमाळ, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, ज्ञानोबा देवकते, प्रेमकुमार केदार यांनी यथोचित बंदोबस्त ठेवला आहे.