राळेगांव येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती भाजपा कार्यकर्ता सवांद बैठक

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथे हरेकृष्ण मंगल कार्यलयात दि २८ सप्टेंबर रोजी ११ वाजता भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ही कार्यकर्ता सवांद बैठक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या उपस्थिती पार पडली.
यावेळी मंचावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे,आमदार प्रा,डॉ अशोक उईके, जिल्हा सरचिटणीस अनिल राजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रफुलसिंह चव्हाण,विधानसभा प्रमुख सतीश मानलवार,भाजपा तालुक्याध्यक्ष चित्तरंजन कोल्हे,कैलास बोंद्रे नितीन परडके वीरेंद्र तोरखडी,शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर,प्रशांत तायडे, संजय काकडे,अनिल नंदुरकर, भाजपा तालुकाध्यक्ष वंदना कुटे, उषाताई भोयर,माधुरीताई केवटे,विद्याताई लाड,यांचे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे राळेगाव नगरीत पहिल्यांदा आगमन झाल्याने भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके फोडून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन प्रसंगी राळेगाव शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या बाईक रॅली ची सुरुवात शहरातील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभागी होत शहरातील संपूर्ण महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले. या बाईक रॅलीमध्ये तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी जवळपास ३०० च्या वर आपली दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. या रॅलीने शहरातील अनेक नागरिकांचे लक्ष वेधले होते. हरे कृष्ण मंगल कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.नंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीला राळेगाव मतदारसंघातील भाजपा जिल्हा व मंडळ पदाधिकारी,सोशल मीडिया, शक्ती केंद्रप्रमुख सर्व आघाडी अध्यक्ष व सदस्य,महिला आघाडी,बूथ प्रमुख सदस्य व भाजपा कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.