
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे ग्राहक दिन दिनांक
24 डिसेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यार्थ्यांना . ग्राहक जागृती व ग्राहकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राळेगाव तालुका ग्राहक पंचायत चे कोषाध्यक्ष भूपेंद्र कारीया यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका मनीषा इखे या उपस्थित होत्या.याच कार्यक्रमात विदयार्थ्यांना योगासन मार्गदर्शन सूरज गुजरकर,पवन वर्मा यांनी केले तर या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजेश काळे यांनी तर संचलन पर्यवेक्षक सूचित बेहरे यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते….
