
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कोच्ची या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे.अश्या गढूळ पाण्याने परिणामी ग्रामस्थांना आजार जडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोच्ची येथील ग्रामस्थांना अशुद्ध पाणी वापरावे लागत आहे. तसेच नळाद्वारे येणारे अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.कपडे, भांडी आणि आंघोळीसोबतच नाईलाजाने ग्रामस्थांना या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. परिणामी अशा दुषीत आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे आजार बळकवण्याची भीती आहे. मात्र प्रशासन या समस्येकडे दुर्लेक्ष करत असल्याचे गावकरी सांगतात.कोच्ची येथील सचिन गोफने व शँकर जवादे गढूळ पाणी घेऊन राळेगाव येथील जनता दरबारात पोहचले,ह्यावेळी सचिन गोफने यांनी चक्क आमदारांसमोर ते गढूळ पानी पिऊन पाण्याची समस्या मांडली. व गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात विनंती केली.
