
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
गुजरी – (नागठाणा )येथे भावगंध सार्वजनिक वाचनालय तर्फे स्वर्गीय भाऊरावजी गोंडे यांचे स्मृती प्रित्यर्थ कीर्तनातून समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी माता मंदिर चे प्रांगणात दिनांक 25 फेब्रुवारी 2023 ला संपन्न झाला श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्तरार्धात या समारोपिय वागयज्ञात प्रसिद्ध कीर्तनकार प्रा.श्री यशवंत देशमुख महाराज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांचे “आपुलिया हिता असे जो जागता” या विषयावर कीर्तनपर प्रबोधन झाले.त्यांनी शिवराय घडावे,जिजामाता सारखी आई पुन्हा जन्मावी त्यांचे आदर्श आपन जोपासावे भेद न करता बंधुभाव निर्माण होईल असे संस्कार करावे असे सांगितले विविध दाखलयांनी त्यांनी भाव स्पष्ट केला.त्याप्रसंगी त्यांना वाद- संगीत साथ देण्यासाठी कथा प्रवक्ते हरिभक्त परायण श्रीमद श्री प्रल्हाद महाराजशास्त्री, श्री गजानन महाराज सुरकर,श्री पांडुरंग महाराज सहारे,श्री रमेश महाराज विलायतकर ,श्री अरुण महाराज खंदार ,श्री सदाशिव महाराज परचाके ,श्री गोपाल महाराज बोरसरे, मुक्ताबाई गोंधळकर यांनी साथ दिली .तर श्री मारोतीदादा आत्राम व मित्र गु से म परसोडी तसेच तबला वादक व पेटीची साथ देण्यासाठी श्री दिगंबरजी राऊत ,उमेशजी भोयर, बंडूभाऊ कांबळे होते. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालया तर्फे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धाचे बक्षीस वितरण सन्माननीय कीर्तनकार ,पाहुणे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व यशस्वीतेसाठी श्री गंगाधरजी घोटेकर ,गु से मं जिल्हा प्रचारक, लक्ष्मीमाता ट्रस्टचे श्री रामकृष्णजी राऊत व सदस्य, सुनीलभाऊ गोंडे ,योगेशभाऊ गोंडे, श्री भाऊरावजी वराडे, श्री भगवानजी दांदडे ,श्री दिगंबरजी राऊत ,श्री रामभाऊजी ढोकणे, अरुनभाऊ गोंडे ,किशोरभाऊ गोंडे व समस्त रसिक श्रोते गावकरी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
