यवतमाळ शहरातील आर्णी रोडवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ



प्रतिनिधी : अरुण देशमुख यवतमाळ


यवतमाळ शहरात आर्णी रोडवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ असल्याकारणाने येणाऱ्या जाणाऱ्या व दुचाकी फोर चाकी वाहनाला वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे यावर यवतमाळ नगरपालिकेचे दुर्लक्ष पावसाळ्याचे सीजन सुरू झाले आणि मोकाट जनावरे आणि रस्त्यावर येऊन बसतात आणि त्यात हे जनावर भांडण सुद्धा करतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या फोरव्हील वाहनाला तसेच एस टी महामंडळ ला वाहन चालवावा लागतो हे जनावरे आणि मध्यभागी बसून वाहनांसाठी अजिबात रस्ता नसतो त्यात हे जनावर एकमेकांशी भांडण करून कुठल्यातरी एखाद्या वाहनावर धडकतो आणि त्या वाहनातला ड्रायव्हर किंवा इतर प्रवाशाला दुखापत होऊ शकते यावर नगरपालिका प्रशासनाचा काही लक्ष नाही नगरपालिका प्रशासनाचे मनमानी कारभार चालला दिसतोय हा रस्ता नेहमीचा वरदडीचा असून सारखे ह्या रस्त्याने वाहने सारखे वाहने येणे जाणे करत असतात अशा वेळेस या मुकाट जनावर एकमेकांशी भांडण करून कोणीतरी गाडीवर धडकते आणि त्याच्या जीव जाण्याची संभावना लागते प्रशासनाला जात किंवा येणार एखाद्याला जीव गेल्यानंतर जाग येणार का इथल्या नागरिकांना प्रश्न पडला आहे नगरपालिकेला वारंवार सांगून सुद्धा नगरपालिकेच्या लक्ष देत नाही या मोकाट जनावरांच्या भांडणात जर एखाद्याला जीव गेला तर यावर प्रशासन जबाबदार राहील असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. या मुका जनावराचा नगरपालिकेने जर बंदोबस्त केला नाही तर नगरपालिकेवर धडक मोर्चा असा इशारा पण दिला आहे.