बजरंग दल राळेगाव तर्फे दहशतवादी हल्ल्याच्या निषेध

सहसंपादक : रामभाऊ भोयर

जम्मू-कश्मीर येथील वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या कटारा ते शिव खोडी दरम्यान रविवार, ९ जून रोजी हिंदू भाविक भक्तांच्या बसवर पाकिस्तानी आतंकवादी पोषित इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ल्यात १० निष्पाप हिंदू यात्रेकरू मारले गेले. या घटनेचा तीव्र निषेध करीत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन वैष्णोदेवी भक्तांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ही घटना संपूर्ण देशवासियांना हादरवून टाकणारी आहे आणि या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण देश संतापला आहे. जम्मू-काश्मीरला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा अनेक जम्मू काश्मीर मधील हिंदूंना त्रास सहन करावा लागत आहे. कलम ३७० हटविल्यानंतरआशेचा किरण निर्माण झाला आहे. मात्र, दहशतवाद्यांचे मनोधैर्य अद्याप कमी झालेले नाही. हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटना घडत आहेत आणि यामागे पाकिस्तानचा हस्तक्षेप वाढला आहे. देशाच्या नव्या सरकारच्या शपथ विधीवेळी असे धाडसी कृत्य करून इस्लामी दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे.

विहिंप व बजरंग दल मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करते परंतु केंद्र सरकारला अशा कारवाया पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी निर्णायक कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्याची
विनंती करतो. घटकांना आश्रय देणाऱ्यांवरही कडक आणि योग्य कारवाई करण्यात यावी
निवेदन देते वेळी, राळेगाव बजरंग दल अध्यक्ष जगदीश भाऊ निकोडे, सागर भाऊ वर्मा, युवराज देवकर, अंकित क्षीरसागर, आदर्श गहरवाल, प्रतिक गिरी, सुनील चाहार, कृष्णा खेडेकार,
स्वप्नील घोडे, नयन डडमल, लखन कानोजिया, शौर्य गांधी सुमित कुंड, हर्षल कांबळे, रोशन झाडें, गणेश शेंडे, ऋतिक आत्राम, सोहम देवकर, महेश राऊत, इत्यादी बजरंग दल कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.