आरक्षणातील घुसखोरी थांबविण्या करिता सर्व आदिवासी समाज एकत्र

आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये. यासाठी आज दिनांक 28 /09/ 2025 रोजी दुपारी एक वाजता राळेगाव तालुका आरक्षण बचाव कृती समिती राळेगाव च्या वतीने विश्रामगृह राळेगाव येथे महेशजी कोडापे,यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. हि बैठक होणाऱ्या
दिनांक १०/१०/२५ रोजी आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा यशस्वी करण्यासाठी घेण्यात आली आहे.
या सभेकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ चे पदाधिकारी उपस्थित होते. राजूभाऊ चांदेकर, किरण कुमरे, वसंतराव गेडाम,कृष्णाजी पुसनाके, बळवंतराव मडावी, मधुसूदन कोवे,
वरील सर्व मान्यवरांनी उपस्थिती असलेल्या 200 आदिवासी बांधवांना दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या महामोर्चा शंभर टक्के यशस्वी करण्याकरिता मो लाचे मार्गदर्शन केले.व सर्व आदिवासी समाज बांधवांनी या मोर्चात लाखोच्या संख्येने शामिल होण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
यावेळी संदीप पेंदोर,मधुकरराव गेडाम, दिलीपराव कनाके, महेशजी कोडापे, महादेवराव मेश्राम, रामदासजी कुरसंगे शंकरराव तुळासे मनोज पेंदोर रामचंद्रजी मेश्राम, निलेश शिवरकर तोमर मॅडम,दिनेश करपते रमेश जी पेंदाम इत्यादी मान्यवरांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.