ढाणकी येथे भर चौकात भीषण अपघात,दुचाकी स्वाराचा मृत्यू

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान

ढाणकी येथे काल सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास कंटेनर MH 04 . B.G.670. चे खाली एका दुचाकी स्वाराचा MH 29 B Y 6028भीषण अपघात झाल्याने, दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला .त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
खरुस खुर्द येथील शुभम रमेश दवणे नामक युवक आपल्या दुचाकी ने उमरखेड कडे जात असताना, ढाणकी येथे भर रस्त्यात असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या गर्दीने बाजूने जात असलेल्या कंटेनरने त्यास उडवीले, तेव्हा उपस्थितांनी एकच आरडाओरडा केला असता कंटेनर थांबविले, परिस्थितीचे गांभीर्य पाहता कंटेनरच्या ड्रायव्हर ने तिथून पळ काढला. परंतु अपघात झालेला तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याने, उपस्थितांनी १०८ ॲम्बुलन्स ला फोन केला असता, जवळपास दीड ते दोन तास ॲम्बुलन्स आलीच नाही, शेवटी नगरपंचायतच्या ॲम्बुलन्स ने त्या युवकास उमरखेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहीती उपस्थित नागरिक सांगत होते.
108 ॲम्बुलन्स ला पत्रकार यांनी फोन केला असता तिकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली. पेशंट मृत्यूच्या शय्येवर असताना 108 वाले कर्मचारी प्रश्नाचा भडीमार करत होते. यावेळेस पेशंटला अर्जंट दवाखान्यात नेणे महत्त्वाचे की यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे महत्त्वाचे? हा प्रश्न निर्माण होतो. यावरून आरोग्य विभागाची यंत्रणा किती कुचकामी असल्याचे लक्षात येते?कदाचित लवकर ॲम्बुलन्स वेळेवर मिळाली असल्यास युवकाचे प्राण बचावले असते. असे बरेच काही नागरिकांचे मत होते.