
महिलांचा सन्मान करायला ग्रामपंचायतला वेळच नाही
शासनाच्या परीपञकाला ग्रामपंचायतने दाखविली केराचा टोपली
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दि.३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करणे बाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शासन निर्णय घेण्यात आला आहे.तसेच त्या संबंधित राज्यातील सर्वच ग्रामपंचायत ला शासनाच्या वतीने तसे आदेश देण्यात आले.त्या आदेश्याची अमलबजावनी जवळपास सर्व ग्रामपंचायत ने केली परंतु त्या सर्वांवर फुलसावंगी ची ग्रामपंचायत भारी ठरली या ग्रामपंचायत ला महिलांचा सन्मान करण्यासाठी वेळच मिळाला नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर दि.३१ मे रोजीच पुरस्कार वितरण कराणे बंधनकारक होते परंतु ग्रामपंचायत फुलसावंगी च्या वतीने कुठल्याही स्वरूपाच्या शासन निर्णयानुसार कार्यक्रम राबवीण्यात आला नाही.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला,तसेच हुंडा निर्मुलन,बाल विवाह प्रतिबंध,महिला सक्षमीकरण,मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार सामाजिक कार्य या सारख्या निकषावर महिलांची निवड करणे व त्यांचा सन्मान करण्याचा शासन निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला होता.परंतु फुलसावंगी च्या ग्रामपंचायतने चक्क शासन निर्णयालाच केराची टोपली दाखविल्याचा धकादायक प्रकार ग्रामपंचायत फुलसावंगी त बघायला मिळाला.तसेच शासनाच्या वतीने पुरस्काराचे स्वरूप देखील ठरवून देण्यात आले आहे त्यामध्ये सन्मानपञ,सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ(नारळ)रोख रक्कम ५०० प्रती महिला देण्यात यावे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती च्या दिवशीच निवड झालेल्या महिलांचा सन्मान करायाचा होता तसेच ४ जुन पर्यंत कार्यक्रमाचा अहवाल छायाचिञासह बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावायचा आहे.आता कार्यक्रमच झाला नाही तर अहवाल पाठविणार कसा हा संशोधनाचा विषय आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महिलांचा सन्मान न केल्याने समाज बांधवामध्ये तीव्र नाराजी आहे.
महिला व बालविकास च्या वतीने शासन स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीला स्पष्ट आदेश होता की, महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व तसेच इतर ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सन्मान करायचा होता. परंतु येथील ग्राम पंचायत ने असा कोणताच पुरस्कार वितरण केला नसल्याने येथील ग्राम पंचायत मधील अधिकारी व पदाधिकारी यांच्या वर शिस्त भंगाची कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन करु.
▪️ अमरदिप ब. दळवे
उपाध्यक्ष भाजपा, महागाव
असा काही प्रकार घडला असेल आणि तशी तक्रार आली तर नियमानुसार योग्य ती कारवाई करू
डि.एच.टाकरस गट विकास अधिकारी,महागाव
मी पुरस्काराबद्दल प्र.सरपंच व सदस्यांना सांगितले होते.परंतु सरपंचांना विकास कामाच्या संदर्भात अमरावतीला जायचे होते.त्यामुळे त्यांनी आपण पुरस्कार वितरण मासिक सभेत करू असे म्हणाले.
एस.बि.पाडाळकर..ग्रामविकास अधिकारी फुलसावंगी
