
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचीत खासदार संजय देशमुख यांचा गुरुवार 18 जुलै रोजी सार्वजनिकरीत्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.भोसा रोड अंबर लॉन येथे लोकनेते बाळासाहेब मांगुळकर व मित्र परिवाराच्या वतीने महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचे या सत्कार कार्यक्रमात शहरातील भोसा रोड,सारस्वत लेआऊट,गोल्डन पार्क, शादाब बाग,कोहिनूर,सोसायटी,कलंब चौक,डेहनकर ले आऊट,विदर्भ हौसिंग सोसायटी,मेमन सोसायटी सह विविध भागातून आलेले असंख्य नागरिक,सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते.या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा शाल,पुष्पगुच्छ व मोठा हार घालून मान्यवरांच्या हजेरीत भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित खा.संजय देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की निवडणुकीत प्रचाराचा व्याप मोठा असल्याने सर्वांची भेट होऊ शकली नाही,पण यानंतरही सर्वांनी या विषम परिस्थितीत मला या निवडणुकीत भरभरून मत देवून विकासाठी बळ देत सहकार्य केले हे उपकार मी कदापि विसरणार नाही,सर्व समाजातील लोकांच्या सार्वजनिक समस्यांचे खासदार या नात्याने सर्वोतोपरी निराकरण करून जिल्ह्याचे सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे वचन दिले.या प्रसंगी मंचावर खासदार संजय देशमुख,हाफीज इब्राहिम,हाफीज मुजाहिद,हाफीज अनिस यांच्या सह विविध मशिदीतील इमाम,हाफीज,माजी आमदार कीर्ती गांधी,काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर, नप चे माजी उपाध्यक्ष शकील अहमद, काँग्रेस नेते राहुल ठाकरे,समीर साहीर लोखंडवाला,शिवसेना उबाठा नेते व सामाजिक कार्यकर्ते भाई अमन,नजीर अहमद यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी खा.देशमुख यांचे शाल,घालून,बुके व हार घालून भव्य सत्कार केला.या कार्यक्रमाचे मंच संचलन शहर काँग्रेस कमिटी कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी केले.खासदार संजय देशमुख यांच्या या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अब्दुल जाकिर,काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी जावेद अख्तर,जुल्फेकार अहमद बबली भाई,शिवसेना उबाठा अल्पसंख्यक आघाडी पदाधिकारी आसिफ अली काजी,मनवर शाह,आरिफ पठाण,सय्यद जाहीद अली,असलम खान सर,हुसैन खान,शकील भाई,नुसरत काझी,इम्रान सुबेदार,सय्यद जाकीर, वसीम अक्रम खान यांच्या सह अनेक लोकांनी परिश्रम घेतले.
