बिरसा मुंडा चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन


प्रतिनिधी:सुमित चाटाळे

पांढरकवडा येथील बिरसा मुंडा चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन दिनांक 27 जुलै 2021 रोजी करण्यात आले.
पांढरकवडा येथील नगर परिषद कडे अनेक सामाजिक संघटना, व आदिवासी समाज बांधवांनी बिरसा मुंडा चौकात पुतळा क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसवून चौकाचे सौंदर्यीकरण करावे अशी मागणी होती , ही मागणी लक्षात येताच नगर परिषद तर्फे कामाकरिता आवश्यक मंजूरी मिळवून,
या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नगर परिषद मुख्याधिकारी श्री. राजू भाऊ मोठ्ठेमवार, व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिनय नहाते, व सागर मडावी, मनोज आत्राम, रोशन आत्राम, अजय कुमरे आदी उपस्थित होते.