
ढाणकी( प्रतिनिधी) प्रवीण जोशी
सामाजिक कामात सतत आपला सहभाग असणारी बँक म्हणून जिजाऊ अर्बन ची ओळख आहे. मग रक्तदान शिबिर असो किंवा कशाही प्रकारची आपत्ती असो जिजाऊ अर्बनने नेहमीच आपली समाजाप्रती दायित्व पार पाडले आहे. याला अनुसरूनच जिजाऊ अर्बन चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापकीय संचालक प्रकाश बिचेवार यांच्या संकल्पनेतून दिनांक 8 तारखेला जिजाऊ अर्बन शाखा ढाणकी यांचे तर्फे बिटरगाव पोलीस स्टेशनला 5 ट्रॅफिक बॅरिकेट्स व 5 ट्रिगार्ड भेट देण्यात आली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापजी भोस, खाजाभाई, दिनेश जयस्वाल, रुपेश भंडारी,शेख जहीर, अमोल तुपेकर, नागेश महाजन , उदय पुंडे. इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते व कर्मचारी वृंद म्हणून शाखा व्यवस्थापक राजेश कदम तेजस तुपेकर श्रीकांत देवसरकर हे उपस्थिती होते.
