
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व माजी महसूल कर्मचारी भाऊराव ठाकरे यांची मानवाधिकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे मानवाधिकार सरंक्षन समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भगवान दाढीया विदर्भ अध्यक्ष देवराव राठोड व गजानन भगत यांच्या मार्गदर्शनात निवड झाली आहे. . भाऊराव ठाकरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समिती ने त्यांना हि जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे श्रेय समितीच्या सर्व़ पदाधिकार्यांना देण्यात येत आहे. भाऊराव ठाकरे यांच्या तालुक्यात असेलेला अनेक वर्षापासून चा संपर्क दांडगा असून त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. त्यांच्या अध्यक्षेते खाली तालुक्यातील मानवधिकार विषयक उपक्रम प्रभावी पणे राबवतील अशी अपेक्षा सर्व स्तरावरून व्यक्त होत असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
