
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सामाजिक वनीकरण विभाग राळेगाव च्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे वन्यजीव सप्ताह निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चित्रकला व निबंध स्पर्धा यामध्ये सहभाग घेऊन वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजिक वनीकरण विभाग या अंतर्गत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव तेथे दिनांक 01 ऑक्टोबर 2024 ते 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत वन्यजीव सप्ताह कार्यक्रम राष्ट्रीय हरित सेना इको क्लब च्या अंतर्गत शाळेत वन्यजीव रक्षण संदर्भात चित्रकला स्पर्धा व वन्यजीव संरक्षण काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये वर्ग नववा व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या अंतर्गत विविध विषयाला अनुसरून चित्र काढण्यात आले व निबंध लेखनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उप मुख्याध्यापक सुरेश कोवे व पर्यवेक्षक सुचित बेहेरे तसेच हरित सेना प्रमुख गोपाल बुरले व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते
या कार्यक्रमाला अनुसरून निबंध स्पर्धा व चित्रलेखन स्पर्धा यांचे गुणांकन करून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले.
