
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील एक ग्रामीण समाज प्रबोधनकार सौ.नानीबाई अवधूत तागडे वय 65 वर्षे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गायनाच्या ताकदीने समाजातील कुटुंब कल्याण योजना दारूबंदी,हुंडाबदी स्त्री पुरुष समानता, हुंडाबळी, ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती,अशा अनेक बाबीवर आपल्या गायनाच्या माध्यमातून समाजाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत असून आजही त्या आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असून त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून, त्यांच्या वृध्दावस्थेचा विचार करून आज त्यांच्या कडे जगण्यासाठी कुठलाही आधार नसून या महिला समाजप्रबोधनकार कलाकारांची शासनस्तरावर आजपर्यंत कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी मानधन मिळवून देण्यासाठी मदत केली नसल्याने त्यांना पुढे आपण आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांना भेडसावत असून त्यांची कला,त्यांची समाजसेवेची धडपड,समाजाप्रती असणारे प्रेम आजही त्यांना शांत बसू देत नसल्यामुळे शासनाने त्यांना महीनेवारी मिळणारे मानधन देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना अविरत सेवा करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी सौ.नानीबाई तागडे महिला समाजप्रबोधनकार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
