
:
हिंगणघाट /प्रमोद जुमडे
हिंगणघाट शहरातील ले.क. विलियम लॅम्बटन यांच्या स्मारकासमोर महान त्रिकोणमितीय सर्वेक्षणातून GTS . स्टैंडर्ड बेंचमार्क 1907 साली स्थापित करण्यात आला. समुद्रसपाटीपासून ज्ञात उंचीचा संदर्भ म्हणून हा बेंचमार्क स्थापीत करण्यात आला.
जमिनीचे विभाजन, बांधकाम, अचूक मोजमाप, नकाशे तयार करण्याकरिता, मोजमापामध्ये सुनिश्चित व सातत्य राखण्याकरिता भारतभर हे बेंचमार्क स्थापित केल्या गेले.
जगात भारतातच या प्रकारे स्टैंडर्ड बेंचमार्क स्थापित करण्यात आले आहे.
पुर नियंत्रणरेषा, पर्यावरणीय बदल, भूप्रदेशातील बदल, मातीची धूप, आपत्ती व्यवस्थापन करिता हे जी. टी. एस स्टैंडर्ड बेंचमार्क महत्त्वाचे ठरले आहे. उपग्रह आणि जीपीएस च्या आगमनामुळे या भौतिक बेंचमार्क उपयोगीता कमी झाली असली तरी ती पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही.
हिंगणघाट येथील सर्वे ऑफ इंडिया द्वारे स्थापित बेंचमार्क त्रिकोनमितिय सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे याची सर्वे ऑफ इंडिया कडून तपासणी करून जतन करण्यात यावे तसेच याची माहिती व उपयोगितेचा फलक लावून याची माहिती लोकांना द्यावी . निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट चे अध्यक्ष प्रविण कडू यांनी जिल्हाधिकारी ,वर्धा व मा. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे कडे सादर केली आहे.