यशवंत विद्यालय खैरी येथे पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच यशवंत मागासवर्गीय मुलाचे वस्तीगृह खैरी च्या वतीने शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 124 वी जयंती उत्सव तथा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 25 डिसेंबर रोजी यशवंत विद्यालय खैरी येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेतील सर्व शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. यावी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक श्री पी जी बिडकर तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ किरण महाजन उपसरपंच डॉक्टर श्रीकांत राऊत हे होते. त्यानंतर जयंती पर्वावर यशवंत विद्यालय खैरी च्या वतीने प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा ,वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. शेवटी दिनांक 28 डिसेंबर रोज बुधवार ला या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण व समारोप करण्यात आला. या बक्षीस वितरण व समारोपय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय खडसे मुख्याध्यापक जी. प. केंद्रशाळा खैरी, रवींद्र निवल ग्राप सदस्य, राजूभाऊ भेदुरकर पोलीस पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एस .पी .बरडे, तसेच शिक्षक डी. एस .बेताल, एस. आर. पवार, एन. बी. काटकर, सौ एस. डब्ल्यू .भडके, सौ .एन .एस .राऊत तथा शिक्षकेतर कर्मचारी के एस धानोरकर, एन .आर .चव्हाण, व्ही. एन. गांजरे, सौ एन व्ही राऊत व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.