
वणी : नितेश ताजणे
शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मेंढोली येथे जिवंत विद्युत तारेचा करंट लागुन एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे सुनिल पुरुषोत्तम ढवस (४०) रा.मेंढोली असे मृतकाचे नाव आहे. सुनिल ढवस यांची वरझडी शिवारात शेतजमीन असुन ते ट्रक्टर व लाईन दुरुस्तीचे खाजगीत काम करत होते.
दरम्यान आज बुधवारी दि.१२ जुलै ला सायंकाळी ६:३० वाजता चे सुमारास संजय जिवतोडे यांचे शेतातील विद्युत खांबावर चढून ते लाईनचे काम करित असताना जिवंत विद्युत तारेचा करंट लागल्याने ते खाली कोसळले अशातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिवारातील सदस्य व गावकऱ्यांनी जिवतोडे यांचे शेताकडे धाव घेतली. याची माहिती मिळताच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतकाचे पश्चात आई, पत्नी व दोन मुली पुजा १० वर्ष आणि आर्या ७ वर्ष असा आप्त परिवार आहे. सुनिल हा घरातील कर्ता पुरुष असल्याने ढवस परिवारावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे
घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहे
