

वरोरा नगर परिषदेची स्थापना दिनांक १७ मे १८६७ रोजी झालेली असुन, त्यानिमीत्य नगर परिषद वरोरा मार्फत दिनांक १७ मे २०२३ ला १५७ स्थापना दिवस साजरा केलेला आहे. स्थापना दिवसानिमीत्य आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मा. आमदाराचे स्थानिक निधीतुन उभारण्यात आलेला ७५ फुट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदन मा. आमदार प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांचे शुभहस्ते करण्यात आलेला आहे.
तसेच मा. आमदारांचे सन २०२१-२२ चे स्थानिक आमदार निधीतुन खरेदी करण्यात आलेल्या शववाहीका व रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा, मा. आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, आमदार, वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांचे शुभ हस्ते नगर परिषद मुख्यालयाचे प्रांगणात करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन नगर विकास विभाग, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धे अंतर्गत नगर परिषदेच्या विजेत्या खेळाडूंचा तसेच २०२२-२३ मधे उल्लेखनिय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दिन दयाल अंत्योदय योजने अंतर्गत बॅक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून मंजूर कर्जाचे धनादेशाचे महिला बचत गटांना धनादेश वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय अधिकारी, वरोरा, श्री आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा व श्री गोडशेलवार, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती वरोरा हे उपस्थित होते. तसेच नगर परिषदेतील माजी नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच प्रतिष्ठीत नागरीक व कर्मचारी वृंद सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उमेश कथडे, व आभार प्रदर्शन श्री निलेश सरागे, यांनी केले
