
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतून हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे.
या स्वच्छता पंधरवडा निमित्याने नगर पंचायतचे नगराध्यक्ष सुलभा गुरुदास पिपरे यांचा वतीने शहरात अत्यावश्यक सेवा देणारे नगर पंचायतचे स्वच्छ्ता कर्मचारी व साफसफाई मजूर यांना औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
रोगप्रतकारशक्ती उत्तम ठेवणारी औषधी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे उत्तम काम करते. नगर पंचायत अंतर्गत काम करणारे शहरात साफसफाई करणारे मजूर यांना कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची दक्षता म्हणून नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांच्या पुढाकारातून औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी उपनगराध्क्ष अजित मंगळगिरिवार, गुरूदास पिपरे,ऋषी कोटरंगे,नगरसेवक दर्शन गोरंटीवार,संजय कोडापे,आरोग्य सभापती श्वेता वनकर,सभापती रोहानी ढोले,आकाशी गेडाम,नगरसेविका उषा गोरंतवार, शारदा गुरूनुले,नंदा कोटरंगे,वैशाली बोलमवार व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
