
तिरोड़ा – स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोज शुक्रवारला नियोजित “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून ठीक सकाळी 11. 00 वाजता मा. मुख्याध्यापक श्री. जी. एच. रहांगडाले यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.
कार्यक्रमात इयत्ता 6 वी ते 12 वी चे संपूर्ण विद्यार्थी सहभागी झाले होते. “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमात विद्यार्थीना, पालकांना, शिक्षक आणि समाज यांना एकत्र आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी, जिथे प्रत्येक मुलाचे वेगळेपण साजरे केले जाते, प्रोत्साहित केले जाते आणि पूर्णतः ओळखले जाते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या ज्ञान तसेच शिकणे हा आनंददायक, परिपूर्ण आणि कधीही न संपणारा प्रवास असावा – हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत संदेश दिला आहे.

“परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम सुरू असताना मा. श्री. विजयभाऊ रहांगडाले, आमदार तिरोड़ा – गोरेगाव मतदार संघ, सौ. सोनाली ताई देशपांडे, माजी नगराध्यक्ष, तिरोड़ा नगर परिषद तसेच मा. स्वानंद पारधी, मा. ओम कटरे, उमाशंकर हरोड़े, मा. चिंतामणभाऊ रहांगडाले इत्यादी कार्यकर्ते यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे श्री. मा. एम. डी. पारधी गटशिक्षणाधिकारी प. स. तिरोड़ा यांनी विशेष भेट दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तंत्रज्ञान नियोजन श्री. मा. एस. आर. दीघोरे व उमेंद्र रहांगडाले ऑटोमोबाइल शिक्षक यांनी केले. तसेच मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
