रानडुक्कराच्या हल्यात अंगणवाडी सेविकेचा दुर्देवी मृत्यू,पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील घटना

पोंभुर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा:-शासकीय कार्यक्रम आटोपून घरी येणार्या अंगणवाडी सेविका ला राणडुकराने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.
शिला रविंद्र बुरांडे वय ४० वर्षे असे मृतकाचे नाव असून ती देवाडा खुर्द येथील रहिवासी आहे.
पंचायत समिती मार्फत चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय खो-खो सामन्याचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले होते त्यात अंगणवाडी सेविकेचा संघ होता त्या संघाकडून शिला बुरांडे या खेळात होत्या सामने आटपून ते परत आपल्या स्वगावी आपल्या पतिसमवेत निघाल्या असता सातारा तुकुम जवळ त्या थांबल्या तेव्हा झुडुपाच्या बाजुला असलेल्या राणटी डुकरांनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवला तो हल्ला एवढा भिषण होता कि यात शिला बुरांडे हिचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले.उमरी पोलिस ठाण्याचे पोलिस पंचनामा करून पुढिल तपास करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पती,दोन मुल,सासु, सासरे,बराच मोठा आप्तपरिवार आहे.शिला च्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.