
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला शिक्षक दिनानिमित्त
श्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षणं व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे सर्व शिक्षक वृन्दाना शुभेच्छा देता ग्रीटिंग भेट देण्यात आले व शिक्षकांचा या वेळी संस्थाचालक में रणधीर सिंग दुहान सचिव सत्यवान सिंग दूहान यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे मुलांना सायबर अवेअरनेस सुरक्षा बाबत माहिती देण्यात आली व पत्रके देऊन सायबर बाबत जागरूक करण्यात आले. ऑनलाईन गेमिंग मुळे मृत्यू तसेच आर्थिक लूट , फसवणूक अशा पध्दतीचे अनेक उदाहरणे देऊन खऱ्या अर्थाने डिजिटल साक्षरता काय असते सांगण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून ग्लोबल व्हिजन कंप्युटर चे संचालक मा. संजय कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र पार पडले. तसेच मुलांना सायबर सिक्युरिटी ची माहिती पत्रके देऊन त्यांना क्लिक कोर्स तथा MS -CIT सारखे कोर्स आपण शिकून खरे साक्षर व्हावे असे आव्हान देखील करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सचिन ठमके सर होते या प्रसंगीशाळेचे सचिव सत्यावन सिंग दुहान आपले मत व्यक्त केले कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून लाभलेल्या सौ सुनिता सत्यवान सिंग दुहान यांनी मार्गदर्शन केले या वेळी सर्व शिक्षकवृंद उपस्तिस्त होते कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा निमसटकर हिने केले तर आधार तृप्ती देठे हिने मानले.
