सहसंपादक : रामभाऊ भोयर
जवान डिफेन्स अँड स्पोर्टस करिअर अकॅडमी वर्धा चा ०४ था वर्धापन दिवस व संरक्षणदल,अर्धसैनिक बल, महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झालेल्या जवान प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारोह “वरदा वर्धन” येथील सभागृहामध्ये खासदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक आंबेडकरवादी विचारवंत डॉ.सुभाष खंडारे, किसान अधिकार अभियान चे प्रवर्तक अविनाश काकडे व प्रमुख अतिथी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी प्रज्वल गांडुळे व राजेश सोळंकी यांची आर्मी मध्ये,सुरज आदमाने यांची नागपूर महापालिकेमध्ये फायरमन पदी, सुनित म्हैसकर यांची आर्मी ऑडनस कॉप्स मध्ये,सुमेध खोब्रागडे व सेजल पोहनकर यांची मुंबई पोलीस मध्ये,प्रगती थुटे ची वनरक्षक पदी,दिनेश बागडे यांची बीआरओ व कोशिंदर पाल यांची बीएसएफ मध्ये निवड झाल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते त्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी माजी सैनिक प्रवीण पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जवान प्रशिक्षण केंद्राच्या उपक्रमाची स्तुती केली व युवक युवतींना संरक्षण दलामध्ये ह्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी वनरक्षक पदी निवड झालेल्या प्रगती थुटे व मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या सेजल पोहनकर नी त्या कशा यशस्वी झाल्या त्याचे अनुभव कथन केले.जवान डिफेन्स अँड स्पोर्ट्स करीअर अकॅडमीचे संचालक प्रवीण पेठे यांनी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यामागील उद्देश,वाटचाल व भविष्यातील नियोजन व शहीद परिवारातील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना व जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे सैन्य भरतीपूर्व लेखी व शारीरिक प्रशिक्षण घेऊ शकत नाही त्यांना निशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल याची घोषणा केली.याप्रसंगी शारीरिक प्रशिक्षक आकाश मांदाडे यांनी पण विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. रचना थुल व आभार प्रदर्शन प्रा.हेमराज पवार व कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रा.प्रवीण सराटे यांनी केले प्रशिक्षण केंद्राचे लोकेश मेश्राम, सुजल कुरवाडे,राज टेंभुर्णे,तेजस गायकवाड,पूजा गोसटकर,मुस्कान पठाण सह सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले