महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी शाळा व महाविद्यालयातील मुलींवर होणाऱ्या अत्याचारा बाबत राळेगाव तालुक्यातील मुलींच्या शाळा व महाविद्यालयांना पत्र

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आपण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याबाबत ज्या प्रमाणे नेहमी सतर्क असता त्याच प्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी यांच्या बाबत देखील सतर्क असणे तितकेच गरजेचे आहे.
सध्या देशात तरुणींवर होत असणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत आपण जागृत असालच. तरी आम्ही शाळा व महाविद्यालय यांना विनंती करीत आहोत की, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या मुला- मुलींप्रमाणे वागणुक दिली पाहिजे.
देशात घडत असणारे प्रकार हे आपल्या शाळेच्या बाबतीत घडू नयेत म्हणून शाळेतील शिक्षक वर्ग व कर्मचारी यांची बौध्दीक क्षमता, त्यांचा स्वभाव तसेच त्यांची विचारसरणी ही तपासणे तितकेच गरजेचे आहे.
शाळेत/महाविद्यालयात सी. सी. टी. व्ही असणे गरजेचे आहे तसेच लहान मुलींना लघुशंकेला घेऊन जाण्यासाठी महिला कर्मचारी असणेच गरजेचे आहे. व कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन गरजेचे आहे सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे व मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांचा आदेश प्रत्येक शालेय शिक्षण संस्थांना असून आपण घडत असलेल्या अत्याचार प्रकरणावरुन सतर्क व्हाल अश्या प्रकारे निवेदन यवतमाळ शहरातील विविध महिलांच्या शाळा व महाविद्यालयांना देण्यात आले

यावेळी राळेगाव मनसे विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष कुणाल खैरी, राळेगांव शहर उपाध्यक्ष ओम मडावी, तालुका उपाध्यक्ष सचीन आत्राम, शेतकरी तालुका उपाध्यक्ष गौरव चवरडोल, दिनेश राठोड, तुषार उईके सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.