
सहसंपादक : रामभाऊ भोयर
् राळेगाव तालुक्यातील राळेगाव ते लोहारा हा रस्ता पुढे सरळ जोडमोहा येथे जाण्यासाठी जवळ पडत असल्याने वाहनधारक या रस्त्यावर आपली वाहने घेऊन चालत असून या रस्त्यावर शासनाने मैलकुली रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निवडले होते परंतु ते मैलकुली मात्र एवढ्यात कुठेही दिसत नाही.अशातच लोकांच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची एवढी वाट लागली आहे की ते त्या वाहनधारकांना विचारलेले बरे.जनतेनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मात्र काही कार्यक्रमानिमित्त या रस्त्यावर एखाद्या वेळी गाड्या घेऊन जातात तेही गाडीचे काच बंद करून एसी लावून त्यामुळे त्यांना या गोष्टी दिसून पडत नाही किंवा दिसले तरी न दिल्यासारखे करून निघून जातात.या मतदार संघाचे विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यांना एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु एवढ्यात मात्र त्यांना सुद्धा मतदारांचा विसर पडला म्हणावं कि काय त्यांचे सुद्धा या राळेगाव तालुक्याकडे फारच दुर्लक्ष झालेले दिसते.मात्र लोहारा गावातील त्यांच्या सुखदुःखात सोबत असणारे पक्षाचे कार्यकर्ते मात्र आस लावून बसलेले आहे की सर आता तरी आपल्या गावातील विकासकामे मार्गी लावतील आता तरी आपला रस्ता दुरुस्ती करून देतील मात्र हे एक कार्यकर्त्यांनी बघीतलेले स्वप्न म्हणावं लागेल की लोकप्रतिनिधी या रस्त्यावर एखादा अपघात होण्याची वाट पाहत आहे हा प्रश्न निश्चितच लोहारावासियांना पडला असून सन्माननीय आमदार साहेबांनी हा रस्त्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावून हे वाहनचालकांचे होणारे हाल ,होणारा त्रास थांबवावा अशी मागणी लोहारा परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
