वरुड जहागीर येथील पुरात वाहुन गेलेल्या शेतकरी दांपत्य वारसास आठ लाखाची मदत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर येथील सुभाष मारुती राऊत तर पत्नी सुरेखा सुभाष राऊत हे दांपत्य शेतात जागली गेले असता सकाळी सात वाजताच्या सुमारास शेतातुन घरी परत येत असताना वरूड धरणाच्या ऐस्टरवरुन जात असतांना पाण्यात पाय घसरल्याने दोघेही पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना ८ आँगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारस घडली त्यामुळे त्यांच्या वारसास शासना मार्फत राळेगाव तहसीलदार यांच्या कडुन प्रत्येकी चार लाख रुपयाची मदत असे दोघांचे आठ लाख रुपये मदतीचे चेक त्यांच्या वारसास नायब तहसीलदार दिलीप बदकी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असल्याने समाधान व्यक्त होत आहे

सततच्या पावसामुळे आधीच पिकांची वाढ थांबली आहे त्यात वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी दांपत्य रात्रीच्या वेळी आपल्या पिकांच्या रक्षणासाठी शेतात जातात त्यामुळे वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाकडून उपाययोजना व्हावी अशी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.