समनक जनता पार्टीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा

दिग्रस तालुका प्रतिनिधी -शंकर चव्हाण

लोकशाही च्या बळकटी साठी, संविधान वाचवण्यासाठी, समनक जनता पार्टी 9 एप्रिल रोज रविवार ला माहूर गड ता. किनवट येथे लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती त लोकार्पण सोहळा पार पडत असून या सोहळ्याचे उदघाटन महान तपस्वी योगानंद महाराज व समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सपंत चव्हाण यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडी चे ऍड. अण्णाराव पाटील राहणार असून ओबीसी, बहुजन, व 18 पगड जातीच्या नव युवकांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन समनक जनता पार्टी दिग्रस तालुका व गोर सेनेचे विठाळा व वसंतनगर चे शाखा प्रमुख महेश चव्हाण (टेलर ) वसंतनगर व राम उमेश चव्हाण विठाळा यांनी केले आहे