
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ८ मार्च २०२५ ला तहसील कार्यालय प्रशासकीय सभागृह राळेगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव च्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सागर विठाळकर सर बालविकास प्रकल्प अधिकारी राळेगाव तसेच पर्यवेक्षीका धरती कोराम, स्नेहा अनपट ,पायल आत्राम पर्यवेक्षीका,शुभम ठाकरे ऑपरेटर,अक्षय रामगडे यांची उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.लताताई माटे यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वागतगीत सादर केले. यावेळी सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी महिलांनी सुध्दा आपापले मनोगत व्यक्त केले, काही महीलांनी तर अतिशय सुंदर गित गायन प्रकार सादर केले. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने संगीतखुर्चीत मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच टिकली लावणे, तळ्यात मळ्यात अशा अनेक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी झालेल्या पुजा गायकवाड, भावना महाजन,रेखा लोंढे, प्रांजली येंगडे, सरला आडे,या महीलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी खुप मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन कल्पना महाकुलकर पिंपळगाव यांनी केले, प्रास्ताविक स्नेहा अनपट पर्यवेक्षीका यांनी केले तसेच आभार धरती कोराम पर्यवेक्षीका यांनी मानले.भोजनानतंर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
