
राहूलभाऊ संतोषवार जि. प.माजी सदस्य यांची मंत्रीमहोदयाकडे निवेदनाद्वारे मागणी
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील आंबेधाणोरा हे गाव तालुक्याच्या मध्यभागी असून या गावासभोवताल ग्रामपंचायत, गटग्रामपंचायत व रीठी गावांची संख्या तब्बल पंचेवीसच्या घरात आहे गावाच्या सभोवतालची गावे हि जंगलानी व्याप्त आहेत अशातच कित्येक वर्षापासून सभोवतालच्या गावातील विद्यूत पुरवठा वारंवार खंडीत होत असून शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मोटार पंप असून सुद्धा पाहिजे तेव्हा पिकाला पाणी पुरवठा करता येत नाहि शासकीय कामात सुद्धा खंडीत होणार्या विद्यूत पूरवठ्या अडथळे निर्माण होत आहेत विद्यूत पुरवठा नेहमीच खंडीत होत असल्याने गावात डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असून डासांमूळे होणारे गंभीर आजार उद्भवत आहेत तेव्हा परीसरातील जनतेच्या समस्या लक्षात घेऊन मौजा आंबेधानोरा येथे ११ के. व्हि.सबस्टेशन मंजूर करण्यात यावा यासाठी जि.प. चे माजी सभापती राहुलभाऊ संतोषवार यांनी राज्याचे वने, सांस्कृतीक व मत्सव्यवसाय मंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे
