परमडोह, चनाखा, पाथरी, कळमना गावकऱ्यांचे भव्य रस्ता रोकोआंदोलन

शिंदोला (२५ ऑगस्ट) :- कळमना ते शिंदो ला या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झालेली असूनही प्रशासन याकडे कसलेही लक्ष देऊन राहिले नाही. आम्ही चौकशी केली असता, दोन कॉन्ट्रॅक्टर दारांच्या मतभेदांमुळे या रस्त्याचे काम रोखले असून याची केस ही सुप्रीम कोर्टात गेलेली अस आम्हास सांगण्यात आलं. परंतु रा सर्व प्रकरणात गावकऱ्यांचा, प्रवाशांचा कसला दोष? यांच्या मतभेदांमुळे गावकऱ्यांनी प्रवाश्यांनी आपले जीव का गमवावेत? असा सवाल गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विचारतोय.

आत्ता नुकतेच काही दिवसांपूर्वी याच रस्त्यांनी एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. त्याआधीही कित्तेक निर्दोशांनी आपले प्राण गमावलेत. आता हे कुठं तरी रोखले पाहिजे, याला आडा घातला पाहिजे.अन प्रशासनाने याकडे लक्ष वेधून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे .
यासाठी दि.२५ – ऑगस्ट – २०२१ रोजी परमडोह, चनाखा, पाथरी, कळमना येथील सर्व गावकरी नागरिक तहसीलदार साहेब यांच्या मंजुरीने पाथरी फाट्यावर भव्य रस्तारोको संवैधानिक आंदोलन करीत आहे. तरी सर्व परिसरातील लोकांनी त्यांना योग्य ती साथ द्यावी असे आव्हान केले आहे.