
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- तालुक्यातील गंगापूर येथील श्री. संजय भंडारे वय ५५ वर्ष व श्री. मनोहर सोपणकार वय ६० वर्ष हे आपल्या दुचाकीने काहि कामानिमीत्य करंजी येथे गेले होते काम आटोपून संध्याकाळच्या सुमारास आपल्या स्वगावी येत असताना चिंतलधाबा जवळ अचानक दुचाकी वरुण नियत्रंण सुटल्याने अपघात झाला अपघात इतका भयानक होता की दोघेहि जागीच ठार झाले घटणेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटस्थळी तात्काळ दाखल झाले असून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्नालय पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले.. या घटनेनी गंगापूर गावात शोककळा पसरली असुन मृतांच्या पश्चात बराच मोठा आप्तरीवार आहे कर्ते व्यक्ती असे अचानक निघून गेल्याने कुंटुबावर दुखःचे डोंगर पसरले आहे
