
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
मौजा चिंचोली (ढा) हे जेमतेम तीन हजार लोकवस्तीचे गाव असून बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती आणि रोज मजुरी आहे दिवसभर मेहताना केल्यानंतर केवळ दोनशे रुपये मजुरी हातात पडते ते पण ज्यावेळी कामाचे दिवस आहे त्याच दिवशी अन्यथा मजुरी लागत नाही परिणामी पैसे मिळत नाही मग आर्थिक चन चन आलीच असे असताना येथील कष्टकरी व गोरगरीब लोकांना शरीराची मुख्य रचना असलेल्या किडनीचे आजाराने ग्रासले असून अनेक दिवसांपासून चिंचोली या गाव खेड्यातील सर्व सामान्य जनता हैराण आहेएक किंवा दोन व्यक्तींना हा आजार जडला असता तर नक्कीच सर्वसामान्यांनी समजून घेतले असते पण मागील काही वर्षात किमान दोन डझन रुग्ण आढळले असून यामध्ये सर्वच वयोगटातील महिला आणि पुरुष आहे हातावर आणायची आणि पानावर खायचे अशी परिस्थिती येथील सर्व सामान्यांची आहे तसेच शरीरातील मुख्य संरचना ही किडनी वरच अवलंबून असते त्यामुळे अनेक आजार बळवतात अशक्तपणा तर दीर्घकाळ असतो आणि काम केल्याशिवाय उदरनिर्वाह तर मुळीच चालणार नाही तेव्हा जी व्यक्ती आजाराने ग्रस्त आहे अशी व्यक्ती कामावर न जाता घरीच उपचार घेत असून येणारी मजुरी सुद्धा थांबली आणि वरून औषधांचा खर्च या सर्व बाबींना येथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे तसेच लोकप्रतिनिधींनी याबाबत आरोग्य विभागाकडून पाण्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे किंवा नेमका हा आजार स्थानिक लोकांना कशामुळे होतो आहे याचे सर्व निदान लावून या गंभीर आजाराची व्याप्ती कशामुळे होत आहे व तो कशी थांबेल हे सर्वसामान्य जनतेसमोर मांडायला पाहिजे तशी जनजागृती प्रशासनाने करायला पाहिजे नक्कीच हा हजार गंभीर असून यावर उपचार सुद्धा महाग आहे ग्रामीण भागातील जनता आधीच आर्थिक संकटात असताना बाहेर शहरात जाऊन उपचार करू शकत नाही .
चौकट
डायलिसिस नावाचा एक यावर उपचार आहे तो पण दीर्घकाळ करूनही आजार बरा होईल व रुग्ण दगावणार नाही याची खात्री नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा आजार नेमका कशामुळे होत आहे आणि तो थांबेल कसा या सर्व बाबींची चौकशी करणे जरुरी असून यातून सर्वसामान्य जनतेची होत असलेली त्रेधातीरपीट थांबा वायला पाहिजे
ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण ,शेतकरी नेते शिवसेना ठाकरे गट जि. प निंगनुर सर्कल
