सोयाबीन पडत्या भावात पांढरे सोनेही काळवंडले (शेतकऱ्यांवर दुहेरी संकट)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

तालुक्यात जुलै ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना आता बाजारपेठेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री मातीमोल दरात करावी लागत आहे तर काही दिवसांपूर्वी किंवा मागील हंगामात बारा ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटल ने विक्री झालेला कापूस अवघ्या पंधरा दिवसात साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल रुपयापर्यंत खाली आला असल्याने पांढरे सोनेही काळवंडले असून
उत्पादकांची निराशा झाली असून
कापसाच्या भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा जुलै ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे नदी नाल्याकाठची पिके जमिनीसह खरडून गेली व संकटातून वाचलेली पिके शेतकऱ्यांनी जोपासली परंतु झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांची वाढ खुंटल्याने सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांचा उतारा निम्म्यावर घटला आहे तसेच कापूस उत्पादनातही मोठी घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याच बरोबर आता बाजारात अपेक्षितप्रमाणे भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसू लागलाय यापूर्वी कापसाला बाहेर जिल्ह्यात १०ते १४ हजार रुपये पर्यंत भाव मिळाला होता त्यानंतर आता काही दिवसातच साय ते साडेसात हजार रुपयावर मिळत असून यापुढेही असाच भाव घसरत राहिला तर कवडी फुटकीही शेतकऱ्यांच्या हाती उरणार नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.