
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला,टेंभी सह खैरगाव या तीन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लास्टिक मिश्रित तांदूळ आढळून आले असल्याची खळबळ जनक बाब काल गुरुवारी उघडकीस आली असल्याने कार्ला येथील ग्रामस्थ राजेश्वर ढाणके सह येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी शाळेत जाऊन तांदळाची पाहणी केली असता सदर तांदळाचे वाटप सुद्धा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने केले आहे आणि त्यांच्या पाल्यांच्या जीवनाशी चाललेला हा खेळ तात्काळ थांबवण्याची मागणी कारला येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर ढानके यांनी एका लेखी तक्रारी द्वारे शाळेच्या मुख्याध्यापकांकडे मागणी केली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना काळाच्या अगोदर अनेक शाळा मध्ये भात शिजवून तो विद्यार्थ्यांना देण्यात येत होता पण आता विद्यार्थ्यांच्या नावे येणारा शालेय पोषण आहार तो शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच देण्याचे काम चालू होते तेव्हा दिनांक 29 जुलै रोजी गुरुवारी मौजे कार्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय पोषण आहारात प्लास्टिक मिक्स तांदूळचे वाटप करण्यात आले असल्याचे आढळून आले ही बाब गावात कळताच येथील पालकांनी शाळे च्या मुख्याध्यापका कडे धाव घेऊन संबंधित तांदळाची चौकशी केली असता काही पालकांनी सदरचे तांदूळ जाऊन बघितले असता ते तांदूळ दाताखाली घेऊन चाऊन बघितले असता ते चपटे होत असल्याचे निदर्शनास आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले या बाबीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कारला येथील राजेश्वर ढानके यांनी या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे एका लेखी तक्रारी द्वारे मागणी केली व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून या साठी कोण दोषी आहे हे शोधून काढावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
